व्यापाऱ्यांवर जीएसटी अधिकाऱ्यांची धाड
मलकापूर प्रतिनिधी नागेश सूरंगे
मलकापूर शहरातील दोन व्यापाऱ्यांवर जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई सुरू केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. याबाबतची माहिती अशी की, वस्तु व सेवाकर (जीएसटी) चे अधिकारी यांनी आज मलकापूर शहरातील व्यापारी फेमस स्टील, सुपर स्टील या दोन प्रतिष्ठानांवर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली असल्याचे वृत्त आहे.
तर नांदुरा येथीलही एका जिनिंग प्रेसिंग व्यापाऱ्यावर अशाच प्रकारची कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क काही व्यापाऱ्यांनी या बाबीला दुजोरा होवू शकला नाही. मात्र शहरातील दिला. जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीमध्ये बरेच काही बाहेर येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.