घरकुलचा चेक काडण्यासाठी पाच हजार रुपयाची मागणी करणाऱ्या रोजगार सेवकावर कारवाईची मागणी
मलकापूर प्रतींनिधी
मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे रमाई घरकुल योजनेचे काम सुरू असून घरकुलचा चेक काढण्यासाठी पाच हजार रुपयाची मागणी करणाऱ्या रोजगार सेवक गौतम झनके यांच्यावर कारवाई करा अशी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे एका तक्रारी द्वारे केली आहे.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की रमाई घरकुल योजने मार्फत घरकुल मंजूर होवून माझे अर्धवट घर तयार झाले आहे. माझे घर करतांना लागणारे मजुर व त्यांचे जॉबकार्ड मी त्यांचे सर्व कागदपत्र पूर्ण करून रोजगार सेवक गौतम देवचंद झनके यास सर्व मजुरांचे जॉबकार्ड नंबर आधारकार्ड बँक पासबुक, फोटो सर्व कागदपत्र दिले परंतु रोजगार सेवकांनी मला ५००० हजार रुपये ची मागणी केली.
परंतु मी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने हेतुपुरस्सर माझा जाबकार्ड चा नंबर मध्ये चुक करून अंकामध्ये अदलाबदल सुनिल चव्हाण यांचे नावाने जॉबकार्ड लावुन ज्यावर की या माझे योजनेशी कुठलाही संबंध नाही अथवा त्याचे पूर्ण ९० दिवस होवून त्याने या योजनेचा फायदा आधीच घेतलेला असताना त्याचे जाणीवपूर्वक नंबर नांव लावुन चुक केली आहे. त्या चुकीमुळे माझे घराचे काम अपूर्ण राहीले आहे आणि सध्या मुसळधार अतिवृष्टी पाउस असुन माझे अतोनात हालाचे बेहाल होत आहे मला लहान लहान मुलं असून त्यांची गैरसोय होत आहे तसेच रोजगार सेवकाच्या चुकीमुळे मला मिळणारे २३.४०० रूपये रोजगार हमीची मजुरी ही रदद होवून माझे नुकसान झाले आहे व तसेच माझे सोबत इतर मजुर त्यांचे सुध्दा नुकसान झाले आहे.त्यामुळे माझे होणा-या नुकसानीची भरपाई करण्यात येवुन रोजगार सेवकाविरूध्द कारवाई करण्यात यावी असेही तक्रारी मध्ये सुनील शेळके यांनी नमूद केले आहे.