नांदुरा सार्वजनिक जय बजरंग भव्य कावळ यात्रेचे आयोजन
नांदुरा प्रतींनिधी
सालाबादप्रमाणे यंदाही सार्वजनिक जय बजरंग कावळ यात्रेचे आयोजन नांदुरा शहर व तालुक्याच्या वतीने येथे १ऑगस्ट रोजी श्रावणच्या पहिल्या सोमवारी करण्यात आले असून गेल्या दोन वर्षांमध्ये कोविड 19 च्या मुळे कावळ यात्रा व सर्व उत्सवांवार प्रतिबंद असल्यामुळे कावड यात्रांना सुध्दा स्थगिती होती मात्र यावेळेस भव्य आणि दिव्य अश्या कावड यात्रेचे नांदुरा शहर व तालूक्याच्या वतीने जय बजरंग सार्वजनिक कावळ यात्रेच्या माध्यमातून आयोजित केली असुन याच्यामाध्यमातून शिवभक्तांमध्ये नवचैतन्य संचारले आहे
कावळ यात्रा नांदुरा शहराचे आराध्य दैवत अंबादेवी गड पंचवटी येथून पूर्णा नदीवर जल घेऊन व पुन्हा नांदुरा येथील श्री महादेव मंदिर येथे शिवलिंगाला जलाभिषेक करुण यात्रेची समाप्ती करण्यात येणार आहे व महाप्रसाचा कार्यक्रम नांदुरा जळगाव गेट बाहेरील श्री गणेश मंदिर येथे ठेवण्यात आलेला आहे तरी या भव्य आणि दिव्य अशा कावळ्यात्रेमध्ये जास्तीत जास्त शिवभक्तांनी हिंदू प्रेमींनी तरुण युवकांनी सहभाग घेउन यात्रै ची शोभा वाढवावी असे आवाहन तालुका अध्यक्ष राजेश पाटील काळे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे