सामान्य नागरिकांसाठी विविध शासकीय योजना शिबिराला तहसीलदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे प्रारंभ
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड -मौजे कासुर्डी येथे सुवर्णकन्या फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आपले सरकार सेवा केंद्र यवत, कासुर्डी भांडगाव यांच्या संकल्पनेतून तसेच ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक तलाठी यांच्या सहकार्याने आज संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अपंग दिव्यांग योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, ई श्रम कार्ड शिबिर कॅम्प आयोजित करण्यात आला होता. सदर शिबिर हे दौंड तहसील कार्यालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास संजय पाटील तहसीलदार दौंड, भानुदास येडे मंडलाधिकारी यवत, प्रमोद झुरुंगे तलाठी कासुर्डी भरतगाव, तसेच कासुर्डी भरतगाव गावचे सरपंच, उपसरपंच माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, कासुर्डी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी तहसीलदार दौंड संजय पाटील यांनी सदर शिबिरा बाबत नागरिकांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिबिरा बाबत आढावा घेतला व समाधान व्यक्त केले. सदर शिबिरास पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद दिसून आला सदर शिबिर सोमवार 25 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. सदर शिबिरास गावागावातून वाडी वस्ती वरून प्रचंड प्रमाणात ज्येष्ठ नागरिक व महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले. तसेच ग्रामस्थांनी शिबीर बाबत समाधान व्यक्त केले. या शिबिरास पहिल्याच दिवशी संजय गांधी निराधार योजनेचे 43 अर्ज तसेच जेष्ठ नागरिक कार्ड साठी 58 अर्ज प्राप्त झाले. अजून तीन दिवस सदर शिबीर चालणार आहे. उर्वरित गरजू ग्रामस्थांनी व लाभार्थ्यांनी सदर शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन सुवर्णकन्या फाउंडेशन, मराठा महासंघ, आपले सरकार सेवा केंद्र, आणि दौंड तहसील कार्यालय यांच्याकडून करण्यात येत आहे.