Breaking News
recent

तिरंगा झेंडे वाटप करण्याची इच्छा असणाऱ्यांनी न.प. कार्यालयाशी संपर्क साधावा- मुख्याधिकारी ढगे



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

  मलकापूर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर झेंडा' उपक्रम मलकापूर शहरात राबविण्यात येणार आहे. नागरिकांना तिरंगा झेंडा वाटप करण्याची ज्या पदाधिकारी, बँका, एनजीओ, व्यापारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची इच्छा असेल त्यांनी तिरंगा झेंडे मलकापूर नगर पालिकेत भांडार विभागात संपर्क साधून जमा करवे, असे आवाहन मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमिवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लींग कायम तेवत रहावे व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने केंद्र सरकारने या दैदिप्यमान इतिहाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर झेंडा उपक्रम राबविण्याचे जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने ज्यांना तिरंगा झेंडे वाटप करावयाची इच्छा असेल त्यांनी न.प. कार्यालयात संपर्क साधून झेंडे जमा करण्याचे आवाहन मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी केले आहे


Powered by Blogger.