प्रति पंढरपूर देऊळगाव माळी येथे होणार आषाढी उत्सव संपन्न
मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर
प्रति पंढरपूर देऊळगाव माळी येथे उलटला एकादशी निमित्त अलोट भक्ती सागर. संप्रदायाची दुसरे माहेरघर असलेली श्रीक्षेत्र देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे विठ्ठल रुक्माई चे साडेतीनशे वर्षाहून अधिक प्राचीन मंदिर आहे. अशा या विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील भावीक भक्त देऊळगाव माळी येथे येतात व विठू माऊली चे दर्शन घेऊन तृप्त होतात.
अशा या प्रति पंढरपुरात गेल्या दोन वर्षापासून कोविड काळामुळे विधिवत पूजन करून उत्सव संपन्न झाला परंतु यावर्षी परंपरेनुसार खूप मोठा उत्सव साजरा होणार आहे. हा अशा सोहळा सोमवार दिनांक 4 जुलै पासून सुरू झाला असून याची सांगता 15 जुलैला होणार आहे. या कालावधीमध्ये भागवताचार्य ह.भ. प. श्री प्रकाश महाराज मगर यांच्या अमृतवाणीतून ज्ञानामृत सुरू आहे. तसेच आषाढी एकादशी निमित्त ह.भ.प. बळीनाथ गिरी महाराज( स्वामी समर्थ सेवा आश्रम देऊळगाव माळी) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. जसा पंढरपूरला सोहळा पार पडतो तसाच सोहळा प्रति पंढरपूर देऊळगाव माळी येथे सुद्धा पार पडत असतो. गोपाल काला दि.13 जुलै आषाढ शुद्ध पौर्णिमा होणार असून महाराष्ट्रातील सर्वात मोठा दीडशे किलो दहीहंडीचा कार्यक्रम दिनांक 14 जुलै गुरुवारला सायंकाळी साडेसहा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत गावातील मानकऱ्याच्या हस्ते फोडण्यात येणार आहे.
या भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील हजारो भावी भक्तांसह जवळपास 200 हून अधिक दिंड्या हातामध्ये टाळ, मृदंग, वारकरी संप्रदायाचा भगवा पताका, घेऊन चिपळ्यांच्या स्वरा संगे संतांची भजने अभंग गात सामील होतात. आणि दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर गावांमधून श्री च्या पालखीची मिरवणूक ही 15 जुलैला सकाळी चार वाजता पासून सुरु होणार आहे. आलेल्या सर्व वारकऱ्यांना श्री संत सावता भोजन समिती व संत सेवा भोजन समितीच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा या भव्य दिव्य उत्सवाची तयारी सध्या प्रति पंढरपूर देऊळगाव माळी येथे सुरू असून येथे यात्रा सुद्धा भरत असते. या उत्सवाचा सर्व भाविक भक्त, यात्रेकरू, दुकानदार यांनी लाभ घेण्याची आवाहन श्री पांडुरंग संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री पांडुरंग संस्थान देऊळगाव माळी येथे आषाढी सोहळा 4 जुलैला सुरुवात झाली असून या उत्सवाची सांगता शुक्रवारला 15 जुलैला श्रीच्या पालखीच्या मिरवणुकीने होणार आहे. 13 जुलैला गोपालकाला 14 जुलैला महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहीहंडी सोहळा संपन्न होणार.