तक्षशिला नगर येथे वर्षावास निमीत्त ग्रंथ वाचन सुरू.
आषाढ पौर्णिमेपासून सुरू झालेल्या वर्षावास निमीत्त स्थानिक तक्षशिला नगर नांदुरा येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे वाचन सुरू झाले आहे.हे ग्रंथ वाचन आषढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमे पर्यंत सुरू राहील. वर्षावासात काही लोक तीन महिन्याचे उपोसथ व्रत सुद्धा करतात.ग्रंथाचे वाचन वृत्तरत्न सम्राटचे प्रतिनिधी तुकाराम रोकडे हे करीत आहे.
ह्या ग्रंथ वाचन कार्यक्रमाला शहरवासीयांनी उपस्थितीत राहण्याचे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमाचे आयोजनात बाळू चापके, जिवन जाधव, गणेश बांगर,सुभाष तेलंग,शालीग्राम हेलोडे एस.के.खंडेराव,रामेश्वर रणित,सुनिल तायडे,डाॅ. प्रमोद सुरळकर ,राजू भिडे,राजेंद्र इंगळे यांचा सहभाग आहे.ह्यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासीका उपस्थितीत राहतात.