शिवसेना नांदुरा तालुका वतीने बँक ऑफ महाराष्ट्र शेंबा येथे एक दिवसीय ठिय्या आंदोलन
श्रीकांत हिवाळे नांदुरा प्रतिनिधी
शेंबा कर्ज मिळेल या आशेने शेतकरी पीक कर्जासाठी लागणारे सर्व कागदपत्रे गोळा करून बँकेकडे फाईल दाखल केले आहेत. दीड ते दोन महिने लोटले तरी कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यात बँकेबद्दल संतापाचे वातावरण पसरले आहे. एकीकडे शेतीतील शेतमालाला हमीभाव नसणे,आणि बी बियाणे रासायनिक खत, औषध, मजुरी यामुळे अगोदर शेतकरी हवालदिल झालेला आहे.याच अनुषंगाने नांदुरा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा येथे बँकेमध्येच बँक चालू असताना नांदुरा तालुका शिवसेना वतीने एक दिवसीय ठिय्या आंदोलन दि. १६/७/२०२२ रोजी करण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा मॅनेजर पवन कुमार यांनी अगोदर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून नंतर त्यांच्या वरिष्ठांची (अकोला, बँक ऑफ महाराष्ट्र)संपर्क साधून शेतकऱ्यांना २४ तारखेपर्यंत रक्कम जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले. जर २४ तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही तर नांदुरा तालुका शिवसेना वतीने झोनल कार्यालय अकोला येथे आंदोलन करण्यात येईल.
असा इशारा शिवसेना नांदुरा तालुका वतीने देण्यात आला. ठिय्या आंदोलन प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संतोष भाऊ डिवरे, विष्णू घनोकार, शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील पाटील,नीना पाटील, विठ्ठल भाकरे, रामेश्वर जुनारे, कैलास सुशीर, दीपक मानकर, भागवत धनोकार, शिवा कौसलकार, गणेश भाकरे, भागवत अटकर तसेच कार्यकर्ते ,पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.