अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आ.डॉ वजाहत मिर्झा यांना अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन
मलकापुर:- स्थानिक विश्रामगृहावर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आ. डॉ.वजाहत मिर्झा आज दि. 14 जुलै रोजी आले असता त्यांना अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख यांनी निवेदन दिले या निवेदनात नमूद केले आहे की,आमची संघटना संपूर्ण महाराष्ट्र राज्या मध्ये कार्यरत असून दिव्यांग बाधवांचे हक्कासाठी लढत आहे अपंगांसाठी मुख्य विषय म्हणुन संजय गांधी निराधार, श्रावण बाळ ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे या योजनेमार्फत प्रत्येक अपंगांसाठी १०००/- रुपयांचे अनुदान महिन्याकाठी बॅक खात्यात जमा करण्यात येते परंतु संपूर्ण महाराष्ट्रात लाभार्थ्यांना तीन -चार महिने वाट पहावी लागते तरी या योजनेचे अनुदान बँक खात्यात जमा होण्यास विलंब होत असल्याने या योजनेतील लाभार्थ्यांना उपासमारीची वेळ येत असल्याने या योजनेतील लाभार्थ्यांसाठी आपण सहकार्य करावे जेणेकरून लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला अनुदान मिळायला पाहीजे.
तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हापरिषद यांचे स्वउत्पन्नातून दिव्यांग बांधवासाठी ५ टक्के रक्कम आरक्षीत ठेवण्याची तरतुद असुनही स्थानीक कर्मचारी व अधिकारी हे दिव्यांगवर निधी आरक्षीत ठेवत नाही, तसेच या योजनेचा संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू आहे, तरी आपण सहकार्य करुन दिव्यांगाना ५ टक्के आरक्षीत रक्कमेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे दिव्यांगाचा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यात यावा.
सिएसपी पॉइन्ट(बॅक मित्र) महाऑनलाईन आयडी सेतु केंद्र तसेच धान्य दुकान, कोरोसीनचे परवाने, प्रशासकिय इमारतीचे आवारामध्ये व्यवसाय चालविण्याकरिता अपंगांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य करावे.तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील विविध समित्यांवर शासन निर्णयानुसार प्राधान्य देण्याचा अग्रक्रम असतांना अपंगांना यात डावलण्यात येत असल्याचे सांगितले, अपंगांच्या समस्या शासन दरबारी विधानपरिषदेत तारांकीत प्रश्न मांडून प्राधान्य क्रमाने सोडविण्याचे आश्वासन आ.मिर्झा यांनी अपंग बांधवांना दिले यावेळी अपंग जनता दल राज्य संघटनेचे सचिव कलीम शेख, अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष हाजी रशीद खाँ जमादार, ॲड.जावेद कुरेशी, डॉ.सलीम कुरेशी, नगरसेवक सनाउल्लाखाॅ जमादार,सलीम बंबाईया,शे.उस्मान,मो.अशपाक,सै.आरीफ,नागेश सुरुंगे,हमीदखान सह अपंग बांधव उपस्थित होते.