Breaking News
recent

विजेचा चा शॉक लागून 32 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

   वरखेड येथील शेतकरी गोपाळ रामधन हडपे (वय ३२) हे विहिरीवरील विद्युत मोटार चालू करीत असताना अचानक स्विच बोर्डात करंट उतरल्याने विजेचा जोरदार शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. गोपाळ रामधन हडपे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ रामधन हडपे यांची वरखेड जंगला लगतच शेतजमीन असून मयत गोपाळ व त्याचे वडिल जनावरांना व मेढ्यांना पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या हौदात पाणी भरण्यासाठी विहरीवरील विद्यूत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. 

   यावेळी अचानक स्विच बोर्डात करंट उतरल्याने गोपाळ हडपे यांना विजेचा जोरदार शॉक लागला. वडील थोड्या अंतर उभे होते आरोळी मारताच वडील धावपळत गेले तो पर्यंत मुलगा खाली पडला आणि त्यांनी तातडीने गोपाळला ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केले.

Powered by Blogger.