Breaking News
recent

देऊळगाव माळी येथे संत सावता माळी पुण्यतिथी साजरी.



मेहकर तालुका प्रतिनिधी ,शिवशंकर मगर

   प्रति पंढरपूर म्हणून समजले जाणाऱ्या देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे गावकऱ्यांच्या वतीने संत श्री शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून गावातील समस्त महिला व पुरुष भजनी मंडळी यांच्या उपस्थितीत प्रदक्षिणा काढण्यात आली. गावामधून प्रदक्षिणा निघत असताना भजनी मंडळांनी एकनाथी भागवत, संत एकनाथांची भारुड, यांच्या माध्यमातून जनजागृती केली. तसेच संपूर्ण गावातून पालखी मार्गावर महिला मंडळी रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले.

   तसेच प्रत्येक महिलेने आपल्या दारासमोर पालखी आल्यानंतर पालखीचे पूजन केले. या प्रदक्षिणा दरम्यान वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी चहापाणी व फराळाची व्यवस्था श्रीराम गिऱ्हे, गणेश गाभणे,  तसेच श्री संत सावता महाराज संस्थान व संत सावता माळी मित्र मंडळ यांच्याकडून करण्यात आली होती. यावेळी आषाढी यात्रेमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व भाविकांचा पांडुरंग संस्थान च्या वतीने सत्कार करण्यात आला.. व शेवटी पालखी विरामस्थ झाल्यानंतर महाआरती व महाप्रसादाने सांगता करण्यात आली.

Powered by Blogger.