Breaking News
recent

नागपूर मुंबई महामार्गावरील अंजनी बु. फाट्या नजीक ट्रक व एसटी बसचा अपघात चालकासह 19 जण जखमी.



मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर

    नागपूर मुंबई महामार्गावर अंजनी बुद्रुक फाट्या नजीक शिंदे बी एड कॉलेज जवळ दिनांक 1 ऑगस्ट रोजी बारा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान एसटी बस व ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये एसटी चालक व प्रवासी जखमी झाले आहे.

    प्राप्त माहितीनुसार  एम एच 20 बी एल 33 14 या क्रमांकाची बस ही औरंगाबाद वरून वाशिमकडे जात होती. तर एम एच 21 बी एच 9797, या क्रमांकाचा ट्रक डोणगाव वरून मेहकर कडे जात असताना समोरासमोर हा अपघात घडला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाले आहेत तर प्रवासी सुद्धा किरकोळ जखमी झाले आहे. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 19 जण जखमी झाले आहे.

    जखमींना उपचारासाठी जवळील ग्रामीण रुग्णालयात घालवण्यात आले आहे. वृत्त लिहेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुढील तपास डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली डोणगाव पोलीस करीत आहे.

Powered by Blogger.