नांदुरा अर्बन बॅंकेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सपन्न.
![]() |
सभासदांना सात टक्के लाभांशाची तरतूद. |
दि नांदुरा अर्बन को-ऑप बॅंक ली नांदुरा ची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅंकेच्या डाॅ. हेडगेवार स्मृती सभागृहात दि.३१ जुलैला सपन्न झाली. सहकार क्षेत्रात एक अग्रमानांकित नागरी सहकारी बॅंक म्हणून असलेल्या नांदुरा अर्बन बॅंकेने आपला ऑडीट वर्ग "अ" यावर्षीही कायम ठेवला.
बॅंकेला चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये तिन कोटी सहा लाख रूपये नफा झाला आहे .
नफ्याचे विनियोजन बॅंकेचे संचालक साहेबराव जवरे यांनी मांडले. त्यामध्ये सभासदांना ७ टक्के लाभांश समकरण निधी रू. ७१ लाख १९ हजाराची तरतूद करण्यात आली आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगी नंतर सभासदांना लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी ह्यावेळी सांगीतले. बॅंकेच्या एकूण ठेवी रू. ४३० कोटी ११ लाख तर कर्ज वाटप रू.२३९ कोटी ४२ लाख केले असुन एनपीएचे प्रमाण ४.२१ टक्के आहे. स्वातंत्र्य मीळूण ७५ पूर्ण होत असुन देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमीत्ताने बॅंकेच्या वतीने सभासदांना राष्ट्रध्वजाचे वाटप बॅंकेचे अध्यक्ष अरूण पांडव व जेष्ठ संचालक विठ्ठलदासजी डागा यांच्या हस्ते करण्यात आले.वार्षिक सभेपुढील विषय पत्रिकेचे वाचन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रप्रसाद पांडे यांनी केले. बॅंकेचे अध्यक्ष अरूण पांडव यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सर्वसाधारण सपन्न झाली.आभार प्रदर्शन बॅंकेचे जेष्ठ संचालक प्रल्हाद भारंबे यांनी केले.