2017 प्रभाग रचनेनुसार पालिका निवडणुका होणार असल्याने प्रभाग 4 मतदान यादी मध्ये घोळ करण्याऱ्यानां चपराक मिळणार: गोपाल तायडे
शेगाव : प्रतिनिधी.
स्थानिक स्वराज्य स्वस्थाच्या निवडणुका 2017 च्या प्रभाग राचने नुसार होणार असून त्या प्रकारचा ठराव राज्यमंत्री बेठकीत करण्यात आला आहे.शेगाव शहरातील प्रभाग क्र. 4 ची मतदान यादी जाहीर करण्यात आली असून त्या मध्ये मोठा घोळ झाला असल्याचा निदर्शनात आले .
अनुसूचित जाती करीता आरक्षित असलेल्या प्रभाग क्र 4 मध्ये भुसंख्य असलेल्या मातंग सामाजितील मते इतर प्रभागात वळवील्याची रीतसर तक्रार अंतिम यादी जाहीर होण्याच्या अगोदर म्हणजे 4/7/2022 घेण्यात आल्यानंतर ही स्थानिक नगर परिषद प्रशासना कडून मातंग समाजाचे मते कोणाच्या तरी सांगण्यावरून इतर प्रभागात वळवीळ्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केला होता. मुख्यअधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात मातंग समजतील मतदान विभाजीत न करता एक ठिकाणी राहुदेण्याची विनंती करन्यात आली होती.
या विषया कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. मातंग या दलित समाजाला प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून केलेला हा पडद्यामाघील कुटील षड्यंत्र होते. राज्य मंत्री मंडळाच्या बेठकीत 2017 च्या प्रभाग रचना नुसार स्थानिक स्वराज्य स्वाथा च्या निवडणुका होणार असलेचा ठराव झाल्याने 2017 मतदान यादी नुसार मातंग समाजातील बहुतान्श मते प्रभाग क्र.4 मध्ये राहणार असल्याने मातंग समाजा मध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णया मुळे समाजाला कुठे तरी न्याय मिळेल. समाजाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी सुद्धा मिळू शकेल. सत्य परेशान हो सकता हे. लेकिन पराजीत नाही.या प्रकारची भावना गोपाल तायडे यांनी माध्यमाशी बोलताना वेक्त केली.