शेगावात लॉजवर बोलावून युवतीवर बलात्कार करणारा युवक अटकेत
वारंवार लॉजवर येण्यास नकार दिल्याने शारीरिक संबंधाचा व्हीडीओ केला व्हायरल पोलिसांनी युवकास केले अटक
प्रतिनिधी नागेश सुरंगेवारंवार लॉजवर येण्यास नकार दिल्याने शारीरिक संबंधाचा व्हीडीओ केला व्हायरल शेगाव-मैत्रीण असलेल्या युवतीला येथील एका लॉजवर बोलावून बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. सदर युवतीने वारंवार लॉज येण्यास नकार दिल्याने युवकाने रेकॉर्ड केलेला शारीरिक संबंधाचा व्हीडीओ स्टेटसवर ठेवून व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शेगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून या युवकास अटक केली आहे.
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्रतिक गजानन मानकर (२३) याची गावातीलच एका मुलीशी मैत्री होती. याचा गैरफायदा घेत त्याने सदर मुलीला शेगाव येथे दर्शनाकरीता बोलावले. यावेळी त्याने मुलीला एका लॉजवर नेले व तेथे बळजबरीने तिच्याशी संभोग केला. असेच कृत्य त्याने बरेचवेळा केले. सदर युवकाने शारीरिक संबंधाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवला होता. तो वारंवार या मुलीला शेगाव येथे लॉजवर बोलावत होता. मात्र त्रासाला कंटाळलेल्या पीडित मुलीने लॉजवर येण्यास नकार दिला, त्यामुळे प्रतिक याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला शारीरिक संबंधाचा व्हिडीओ व्हॉटसअप स्टेटसवर ठेवून व्हायरल केला. याबाबत पीडित मुलीने शेगाव शहर पोस्टेला तक्रार दिली असून यावरुन पोलिसांनी प्रतिक गजानन मानकर याच्याविरुध्द कलम ३७६ (२), (एन) ५०६ भादंवी सहकलम ६७ (ए) २००६ नुसार गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे.