स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यवत मध्ये तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड - भारत देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण देशभरात उत्साहपुर्ण वातावरणात साजरे होत असताना आज यवत पोलीस स्टेशन, यवत ग्रामपंचायत,यवत प्राथमिक विद्यालय व विद्या विकास मंदिर माध्यमिक विद्यालय यांनी प्रभात फेरीचे आयोजन केले होते. प्रभात फेरीची सुरुवात यवत च्या शाळेतून झाली. प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा ध्वज होता व भारत माता की जय , वंदे मातरमच्या घोषणांनी दे्णयात आल्या. यवत बाजारपेठ व संपूर्ण गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दालनांची पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पाहणी करत कौतुक केले . यावेळी रांगोळी व चित्रकलेतून मुलांनी विविध महापुरुषांची अतिशय सुंदर चित्रे व सुबक रांगोळ्या काढलेल्या पाहायला मिळाल्या. प्रभातफेरीची सांगता प्राथमिक विद्यालय यवत येथे करण्यात आली. यावेळी यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना भारत देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देत देशाचा अमृत महोत्सव आनंदात साजरा करण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच समीर दोरगे उपसंरपच सुभाष यादव, यवत विद्या विकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य मासाळ सर तर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे सर, यवत पोलीस स्टेशनचे API लोखंडे,PSI नागरगोजे मोठ्या संख्येने महिला व पुरुष पोलीस कर्मचारी , यवत ग्रामपंचायतचे सर्व महिला व पुरुष कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक ग्रामस्थ उपस्थित होते.