भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्कूल ऑफ स्कॉलर्स तर्फे रॅलीचे आयोजन
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर स्थानिक स्कूल ऑफ स्कॉलर्स क्रीडा विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त ९ ते १५ ऑगस्ट आयोजित विविध कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या सुदीप्ता सरकार यांच्याहस्ते विद्यार्थी, विद्यार्थीनीची भव्य रॅलीने करण्यात आली.आपल्या देशाबद्दल जनतेच्या असलेल्या सदभावना जागृत व्हाव्या व घर-घर तिरंगा या उपक्रमाची प्रसिद्धी व जागृती जनतेत निर्माण व्हावी यासाठी विविध नारे व घोषणाद्वारे जनजागृती करण्यात आली. रॅलीचा समारोप प्राचार्या सुदीप्ता सरकार यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या क्रांतिकारांनी त्यांचे केलेले बलिदान व आत्मसमर्पण, त्यामुळेच खरा स्वातंत्र्य लढा हा पूर्णत्वास आला.
याची आपण सर्वांनी दखल घेऊन आपण त्यांच्या कार्याच स्मरण करून भावी पिढ्यांनी त्यांच्या कार्यास नक्कीच सलाम केला पाहिजे, असे आपल्या भाषणात संबोधित केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे क्रीडा शिक्षक स्वप्नील साळुंके यांनी केले. विद्यार्थी, विद्यार्थीनी भारत माता की जय, वंदे मातरम्, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सा जेसे विविध नारे व घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. रॅलीमध्ये बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनी, शिक्षकेतर कर्मचारी वृंद सहभागी झाले होते.