Breaking News
recent

प्रहार जनशक्ती पक्षा कडून स्थानिक स्वराज्य संस्था ह्या स्वबळावर निवडणुका लढविल्या जाणार


 मलकापूर प्रतिनिधी

    सद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वांनाच लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी व सक्षम उमेदवारांच्या चाचपणीला सुरूवात केली असून आपल्या पक्षाचा उमेदवार हा सक्षम कसा राहील हे बघितल्या जात आहे. त्याचनुसार प्रहार जनशक्ती पक्षाने सुध्दा मलकापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था ह्या स्वबळावर लढविण्याच्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने स्वबळावर निवडणुका लढविल्या जाणार आहेत.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जाळे हे प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात विणले आहे. बुलडाणा जिल्ह्यातही जिल्हा प्रमुख वैभवराजे मोहिते, पक्ष निरीक्षक गजाननभाऊ लोखंडकर यांचे मार्गदर्शनात मलकापूर तालुक्यातही प्रहार जनशक्ती पक्षाने आपले वलय निर्माण केलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात मलकापूर शहर व तालुक्यात जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने, मोर्चे व अधिकाNयांना धारेवर धरीत प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे आजरोजी प्रहार जनशक्ती पक्षाची मोट ही सक्षमपणे मलकापूर तालुक्यात बांधल्या गेली आहे. प्रहारच्या आंदोलनांमुळे अनेक कामे मार्गी लागली असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाकडे आजरोजी नागरिक हे सक्षम असा पर्याय म्हणून बघत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला काही महिने अथवा दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामध्ये नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांमध्ये मलकापूर शहर व तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने जिल्हा उपप्रमुख अजय टप यांचे नेतृत्वात पक्षाच्या माध्यमातून सक्षम व सर्वसामान्यांच्या कामांची जाण असलेल्या उमेदवारांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दिली जाणार आहे. मलकापूर नगर परिषदेचा विचार केला असता मलकापूर नगर परिषदेमध्ये १५ प्रभाग म्हणजेच ३० नगरसेवक हे निवडले जाणार आहेत. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये सुध्दा प्रहारचा उमेदवार निवडणुकीत उतरविला जाणार आहे.

आजतरी प्रहार जनशक्ती पक्षाची कुठल्याही पक्षासोबत वा संघटनेसोबत युती, आघाडी नसून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चूभाऊ कडू यांनी ठरविलेल्या ध्येय धोरणानुसार मलकापूर तालुक्यात सुध्दा त्यांच्या आदेशान्वये निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे झटत  आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष हा इतर पक्षांकरीता मोठे आव्हान ठरू शकतो, असेच आजच्या पक्षाच्या नियोजनावरून दिसत आहे.

Powered by Blogger.