स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विविध आरोग्य उपक्रमाचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा- डॉ. स्नेहा पाटील
वार्ताहर/ प्रमोद हिवराळे जिल्हा प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने नांदुरा तालुक्यात विविध आरोग्यविषयक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गर्भवती महिला तपासणी, कोविड लसीकरण विशेष मोहीम, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व तपासणी, सॅम मुलांची तपासणी, महिला मेळावे व असंसर्गिक आजार तपासणी व मार्गदर्शन, विविध आजारावर समुपदेशन अशाप्रकारे उपक्रमाचे आयोजन गावागावात करण्यात आले असून या उपक्रमाचा तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नांदुरा तालुका अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा, वडनेर भोलजी, शेंबा, टाकरखेड यांच्या अंतर्गत हे सर्व उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना आजाराचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी कोविड लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.याकरिता गावोगावी, शाळेत महाविद्यालयात विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.म्हणून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले कोविंड लसीकरण करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा पाटील व तालुका लसीकरण सहनियंत्रक संतोष तायडे यांनी केले आहे.