सदाचारण ठेवून परमार्थ साधला जावू शकतो हिच खरी शिकवण संत सेना महाराज यांनी दिली-ज्ञानदेवराव तायडे
मलकापूर
नाभीक व्यवसायात साधनसुचिता राखून उच निचतेचे कृत्रिम भेद नष्ट करुन परमेश्वराला अभिप्रेत असलेल्या धार्मीक व सामजिक समतेच्या मार्गाने , सदाचारण ठेवून करु नका , खोटे बोलु नका , प्राणीमात्राची हत्या करु नका असा लोककल्याणकारी मार्ग परमार्थ साधला जावू शकतो असा संदेश संत सेना महाराज यांनी दिला आहे तर चोरी संत सेनाजी महाराज यांनी आम्हाला दाखविला असल्यामुळे त्यांच्या विचार समाजाने अंगीकृत करावे असे प्रतिपादन राष्ट्रीय नाभीक एकता महासंघाचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष ज्ञानदेवराव तायडे यांनी केले .
संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन आज मलकापूर येथील प्राचीन गाडेगांव मंदीर येथे संत श्रेष्ठ सेनाजी महाराज नाभिक सेवा मंडळ मलकापूर च्या वतीने पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यात आला . या प्रसंगी सर्व प्रथम संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची ज्ञानदेवराव तायडे यांचे हस्त सपत्नीक विधीवत पुजा अर्चा करण्यात आली त्या नंतर त्यांना अभिवादन करण्यात आले . या प्रसंगी ज्ञानदेवराव तायडे हे बोलत होत पुढे ते म्हणाले की , परमेश्वर भक्ताच्या भक्तीला व साधेपणाला वश होवून त्यांचे संकटात रक्षण करतो . भक्तांवर प्रसन्न होवून कामेही करतो , याचा प्रत्यय काही संताचे चरीत्र जाणून घेतल्यावर येतो त्यापैकी एक संत म्हणजे संत शिरोमणी सेनाजी महाराज हे आहेत .
या प्रसंगी संत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेला अॅड . साहेबराव मोरे , रमेशसिंह दादा राजपुत , विजयराव जाधव , भाई अशांत वानखेडे , शामभाऊ राठी , संतोषराव रायपुरे , राजु पाटील , बंडुभाऊ चौधरी , अरुण अग्रवाल , बाळु पाटील , संजय काजळे , मिलींद डवले , प्रमोददादा अवसरमोल , गजानन ठोसर , उल्हास शेगोकार , सतिश दांडगे , प्रविण पाटील , शिवराज जाधव , डॉ . पटणी , संतोष बोंबटकार , सोपान शेलकर , राजु फुलोरकर , अमोल राऊत , संचीन शिंगोटे , ज्ञानदेव हिवाळे गुरुजी , निलेश नारखेडे , अनिल मुंघाकर , राजेंद्र वानखेडे , भुषण सनिसे , विनय काळे , विनोद बिन्हाडे , राजु राऊत आदी सर्व पक्षीय पदाधिकारी , विविध सामाजिक संघटना पदाधिकारी , व्यापारी , उद्योजक , पत्रकार बांधव आदी मान्यवरांनी अभिवादन केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश अंबुसकर , ज्ञानदेवराव तायडे , गणेश अमृतकर , वासुदेव आंबेकर , दिपक तायडे , सुधाकर तायडे , बाळु तायडे , राहुल सनानसे , नितीन तायडे , अशोक तांदुळकर , सचिन तायडे , दिलीप तांदुळकर , मयुर अंबसुकर , गोपाळ तायडे , पुंडलिक लोंढे , शिवा खिर्डीकर , दिनेश जाधव , कपील कळमकार , अमोल भोंडेकार , उखर्डा तांदुळकर , विनोद कळमकार , भागवत पर्वते , संतोष सोनोने , रामभाऊ तांदुळकर , पुरुषोत्तम तांदुळकर आदी नी अथक परिश्रम घेतले , या प्रसंगी मलकापूर परिसरातील नाभिक समाज बांधव हे आपल्या कुटुंबासह मोठया संख्येने उपस्थित होते.