राज्यस्तरीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेच्या समारंभात पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर येथे आयोजित राज्यस्तरीय बॅडमिंटन क्रीड स्पर्धेच्या उदघाटण समारंभ अतिशय थाटात संपन्न झाला आहे .
यावेळी राज्यस्तरीय बॅडमिंटन सामन्यांचे उदघाटक आ .राजेश एकडे , तर प्रमुख उपस्थितांमध्ये लोकसेवा शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अरविंद कोलते , तालुका क्रीडा अधिकारी अनिल ईंगळे महाराष्ट्र राज्य बॉलबॅडमिंटन संघटणेचे मंगेश काशिकर , मे . ध्यानचंद अवार्डी प्रदिप गंधे , विनय जोशी , प्रदिप गबाडा , उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी , तहसीलदार राजेश सुरडकर , ठाणेदार विजयसिंह राजपूत , जनता कॉलेजचे प्राचार्य डॉ . पी.एन . लढे , व्हि.बी. कोलते कॉलेजचे प्राचार्य डॉ अनिल खर्चे , बॅडमिंटन स्पोर्टस् असोशिएशन जिल्हा सचिव विजय पळसकर , आयोजन समितीचे प्रमुख मनिष लखानी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार हनुमान जगताप, उल्हास शेगोकार , रमेश उमाळकर,सतीश दांडगे ,धीरज वैष्णव ,कैलास काळे आधी पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.तर चार दिवस चालणार्या या स्पर्धेत महाराष्ट्रभरातील एकूण ३२४ खेळाडूंनी आतापर्यंत सहभाग नोंदविलेला असलेल्याची माहिती स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष मनिष लखानी यांनी दिली . तसेच स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना आकर्षक स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व रोख बक्षिसे दि . २४ तारखेला संपन्न होणार्या बक्षिस वितरण समारंभादरम्यान देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा संघटणेचे सचिव विजय पळसकर प्रा.नितीन भुजबळ यांनी दिली आहे.