Breaking News
recent

नायगांव येथील विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

सोनज येथे राहत्या घरावर कोसळला विद्युत खांब

नांदुरा श्रीकांत हिवाळे

         तालुक्यातील जवळच असलेल्या इसबपूर (सोनज) येथील गाव वस्तीतील विद्युत खांब हा गेली अनेक दिवसांपासून खराब झालेला असल्यामुळे ग्रामपंचायत इसबपूर(सोनज) यांनी वारंवार तक्रार करूनही सदर विद्युत खांबाचे विद्युत कर्मचाऱ्यांनी काम केले नाही, दुर्दैवाने आज दिनांक ०४/०८/२०२२ रोजी सदर विद्युत पोल श्री विश्वासराव देशमुख यांच्या राहत्या घरावर कोसळला, सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही, आणि अश्याप्रकरची विद्युत खांब गावांमध्ये ८ ते १० खांब अशा रीतीने पाऊस पाण्यामुळे खराब झालेले आहेत. तरी विद्युत महावितरणने या सदर विद्युत खांबाची कामे लवकरात लवकर करून जीवितहानी व वित्तहानी टाळावी.

          विद्युत वितरण कंपनी नायगाव येथे ग्रामपंचायत इसबपूर यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे दोन ते तीन वेळेस लेखी तक्रारी व निवेदन देऊनही विद्युत वितरण कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करून सदर विद्युत खांबाचे दुरुस्तीचे काम केले नाही, गावामध्ये अशा प्रकारची ८ते १० विद्युत खांब पाणी पावसामुळे खराब होऊन ती एकीकडे झुकत आहे. यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. नागरिकांनी याविषयी अनेकदा तक्रार करूनही विद्युत कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि अशातच कुणाची जीवितहानी व वित्तहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्नही नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. हे काम लवकरात लवकर न झाल्यास जीवित हानी वित्तहानीची सर्वस्वी जबाबदारी ही विद्युत वितरण कंपनीची राहील असा संतप्त नागरिकांचा सूर आहे.

Powered by Blogger.