शिंदी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या विहीर खोदकामाची जागा तिसऱ्या वर्षीही पाण्याखाली !
![]() |
तीन वर्षापासून विहीर खोदकाम रखडले !पर्यायी जागा शोधण्याची नागरिकांची मागणी ! |
सिंदखेड राजा अनिल दराडे
सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी हे गाव चार हजार लोकवस्तीचे आहे .गावाला पिण्याचे पाणी हे पांनथा शेजारील जुन्या विहिरीवरून करण्यात येत होते त्यावेळी लोकसंख्या कमी होती,परंतु सातत्याने लोकसंख्या वाढली घरेही वाढली व शिंदी गावला पाणीपुरवठा अपुरा पडू लागला.त्यानंतर भोगावती नदी काठी आणखीन एक पिण्याच्या पाण्याच्या विहीर खोदली ,व आज त्याच विहिरीवरून गावला पाणीपुरवठा केला जातो.परंतु लोकसंख्या जास्त असल्यामुळे आठ दिवसा आड शिंदी गावला पाणीपुरवठा होत आहे .आणि हा पाणीपुरवठा दूर व्हावा यासाठी 2017 साली राष्ट्रीय पेयजल योजना जलजीवन मिशन अंतर्गत शिंदी गावाकरिता नव्याने विहीर व पाण्याची टाकी नवीन पाईपलाईन मंजुरात आली ,योजना एक कोटी 29 हजार रुपयाची असल्याचे बोलले जाते.
2017 ला ही योजना मंजूर झाली मात्र प्रत्यक्षात विहीर खोदकाम हे रताळी शिवारातील गायखेडी तलावाच्या काठी असणाऱ्या जागेमध्ये 2019 साली सुरू झाले ,गायकेवाडी तलावामध्ये तीनही ऋतूमध्ये पाणीच पाणी असते ,तलावातील पाणी कमी होत नाही,अशी असताना सुद्धा संबंधित ठेकेदारांनी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या विहिरीचे काम हे तलावाच्या काठावर घेतले,व आज रोजी तब्बल तीन वर्ष होत आहे तरीसुद्धा विहिरीचे काम तलावात पाणी असल्यामुळे रखडले आहे,अजून पावसाळी बाकी असताना सुद्धा एकाच महिन्यामध्ये गायखेडी तलाव तुडुंब भरला आहे,मग अशी असताना राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम इतर दुसऱ्या पर्यायी जागेचा शोध घेऊन का सुरू करत नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे ?
पर्याय जागेचा शोध घेऊन गेल्या तीन वर्षापासून रखडलेले विहिरीचे काम लवकरात लवकर सुरू करा व गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवावा अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे !