हर घर तिरंगा मोहीम-२०२२ पोस्टामध्ये भारतीय तिरंगा ध्वज उपलब्ध
प्रतिनिधी नागेश सुरंगे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांसाठी तिरंगा ध्वज बुलडाणा येथील पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. 25 रूपये प्रती ध्वज याप्रमाणे यासाठी दर आकारण्यात आले आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारत सरकार तर्फे हर घर तिरंगा मोहीम २०२२ राबविण्यात येत आहे.
देशप्रेम, त्याग, बलिदान ही मुल्ये रुजविण्यासाठी प्रत्येक घरावर भारतीय तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. याकरिता बुलडाणा पोस्ट विभागामार्फत केवळ 25 रूपये प्रती ध्वज याप्रमाणे ध्वज जिल्ह्यातील ग्रामीण भागासह सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय डाक विभागाच्या वेबसाईट मार्फत ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध आहे.
नागरिकांनी हर घर तिरंगा मोहीम २०२२ यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमधील तिरंगा ध्वज विक्रीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश अंभोरे यांनी कळविले आहे.