जागतिक छायाचित्रकार दिनाच्या निमित्ताने मलकापूर फोटोग्राफर बांधवांच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
माहिती व तंत्रज्ञानाच्या २१ व्या शतकामध्ये कृष्णधवलचा काळ जावून डिजीटल तंत्रज्ञान आल्याने जग आता खूप पुढे गेले आहे. मात्र आजही कृष्णधवलच्या त्या छायाचित्रांच्या आठवणी कायम स्मरणात राहत आहेत. त्या आठवणी आजच्या डिजीटल तंत्रज्ञान युगामध्ये दिसून येत नसून आपण केव्हाही डिलीट करू शकतो, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार रमेशभाऊ उमाळकर यांनी केले.
जागतिक छायाचित्रकार दिनाच्या निमित्ताने 19 ऑगस्ट रोजी मलकापूर फोटोग्राफर बांधवांच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक आत्मानंद दरबार द्वारा संचालित मतीमंद विद्यालयामध्ये करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ फोटोग्राफर व जे.जी.आर्टस्चे संचालक जगदीश गांधी, मदनभाऊ केला, अशोकभाऊ गुजर, उत्तमभाऊ खर्चे, जेष्ठ पत्रकार रमेशभाऊ उमाळकर, हरीभाऊ गोसावी, मलकापुर आजतकचे संपादक विरसिंहदादा राजपूत, बाळासाहेब जगताप, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन ठोसर यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम जुन्या असलेल्या व त्या जमान्यातील वॅâमेNयाचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या व मतीमंद विद्यालयातील विद्याथ्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी रमेशभाऊ उमाळकर, हरीभाऊ गोसावी, हनुमान जगताप, गजानन ठोसर यांनी जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने पत्रकार व फोटोग्राफर यांच्यातील दुव्यांबाबत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर मतीमंद विद्यालयातील विद्याथ्र्यांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. यानंतर शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकावर माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी फोटोग्राफर योगेश शर्मा, केशव गारमोडे, संजय खर्चे, संजय चवरे, मंगेश टेकाळे, सुरेश चतुर, राजू सुपे, सचिन करांडे, आनंद वाघ, अनिल ठावूâर, दिपक निळे, पंकज देवीकार, श्याम वराडे, संतोष पानसरे, दिपक राऊत, विठ्ठल पाटील, मंगेश तुरक, यश ठावूâर, विनायक उंबरकार, गजू गवई, दिपक राऊत, किशोर राऊत, पुरूषोत्तम रायपुरे, विशाल चिमकर, गुरू नायसे, अनिल गोठी, विनोद चौधरी, संजय कातव, गुणवंत गलवाडे, किशोर पाटील, सुनिल इंगळे, निलेश नारखेडे, ज्ञानदेव पाटील, भगवान हावरे,एम.एन.खर्चे, निखिल फेंगडे,श्याम निर्मल, गौरव बक्षी, शेषराव भगत, विनोद चवरे, अमित खर्चे यांचेसह मलकापूर परिसरातील फोटोग्राफर बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.