उत्कृष्ट तलाठी म्हणून सचिन कलोरे सन्मानित
मेहकर प्रतिनिधी, शिवशंकर मगर
महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याचे सुपुत्र सचिन कलोरे यास खानदेशातील एरंडोल उपविभागाअंतर्गत आदर्श तलाठी म्हणून गौरविण्यात आले. धरणगाव येथे संपन्न झालेल्या महसूल दिनाच्या कार्यक्रमात उप विभागीय अधिकारी मा श्री विनयजी गोसावी साहेब व कार्यकारी दंडाधिकारी मा. नितिन देवरे साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला..मागील वर्षी देखील तालुकास्तरावरचा असाच पुरस्कार सचिन कलोरे यांना मिळाला होता त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन अभिनंदन होत आहे . कार्यात गुणात्मक वाढ करून प्रामाणिक व सचोटीच्या बळावरती उत्तुंग यश मिळाते आदर्श तलाठी सचिन कलोरे यांनी व्यक्त केले. या यशामध्ये मला माझे वरिष्ठ मार्गदर्शक श्री नितीनजी देवरे साहेब व सहकारी यांचे नेहमी मोलाचे मार्गदर्शन लाभत असते आई-वडिलांचा आशीर्वाद व वरिष्ठांचे कौतुकाचे बळ यामुळे मला यश मिळाल्याचे सचिन कलोरे सांगतात