भिमआर्मी जिल्हा अध्यक्ष सह अनेक मान्यवरांनाचा ऑल इंडिया पँथर सेनेमध्ये जाहिर प्रवेश
नांदुरा प्रतिनिधी
ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा प्रभारी राहुल भाई वानखडे यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हा अध्यक्ष प्रकाशभाई धुंदळे यांचे अध्यक्षते नांदुरा येथील स्थानिक शासकिय विश्राम भवनावरी आयोजित कार्यक्रमात भिम आर्मीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रविण भाई गुरचळ यांनी घाटाखालील सात तालुक्यातील ६५ ग्रामशाखेसह तसेच मलकापुर येथील तरूण तडफदार व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते भिमराज भाई ईंगळे यांनी सुध्दा शेकडो कार्यकर्ते सह ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दिपक भाई केदार यांच्या आक्रमक नेतृत्वावर विश्वास दाखवत ऑल इंडिया पँथर सेनेत प्रवेश घेतला.
कार्यक्रमा अंतर्गत नांदुरा तालुकाध्यक्ष पदी ग्राम वसाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य आयु.संदिपभाई ईंगळे यांची तर मलकापुर तालुका अध्यक्ष म्हणुन परिसरात तडफदार तसेच आक्रमक म्हणुन प्रसिध्द असलेले चंद्रशेखर झनके यांची तर मलकापुर शहराध्यक्ष पदी सागर तायडे यांची नियुक्ति करण्यात आली. यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रकाश धुंदळे,जिल्हा प्रभारी राहुल भाई वानखडे, जिल्हा निरिक्षक विजय भाई वानखडे,जिल्हा नेते प्रविणभाई गुरचळ,जिल्हा नेते भिमराज भाई ईंगळे,यांच्या सह जिल्हामहासचिव अतुल भाई ईंगळे, खामगांव तालुकाध्यक्ष यांच्यासह मान्यवरांनी आपले विचार मांडले.यावेळी शासकिय विश्राम भवनावरी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.