हवामान केंद्राच्या चुकीच्या नोंदमुळे शेतकर्यांना फटका, तोडगा काढण्याचे कृषी अधीक्षकांचे आश्वासन
मतीन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर
संग्रामपुर तालुक्यातील बावनबिर मंडळातील मृग बहार संत्रा पीक विमा धारक शेतकऱ्यांना १५ जून ते १५ जुलै या दरम्यान हवामान केंद्राच्या स्वयंचलित चुकीच्या नोंदमुळे शेतकर्यांना लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडलेला आहे. स्वयंचलित हवामान केंद्राची चुकीच्या नोंदमुळे लाभापासून वंचित राहिलेले शेतकर्यांना लाभ मिळावा या मांगणी साठी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय ढगे यांनी बुलढाणा येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय गाठून बावनबीर मंडळातील विश्रामगृहावर असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राची छेडछाड झाल्याचा लेखी पुरावा शासनाला दिला. त्याचा पाठपुरावा म्हणून जिल्हा कृषी अधिक्षक डाबरे यांनी ताबडतोब दखल घेऊन दिनांक २५ ऑगस्ट बुधवार रोजीच त्यांचे कार्यालयात संबंधित सर्व अधिकाऱ्यांना बोलावून विषय समजून घेतला आणि याबाबत लवकरच लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांना दिले. यावर जिल्हा कृषी अधीक्षक डाबरे यांनी तातडीने कारवाई सुरु केल्यामुळे कॉंग्रेस कमेटीचे जिल्हा सरचिटणीस संजय शालिग्राम ढगे, बावनबिर उपसरपंच शेख नजीर शेख कदीर, युवा शेतकरी भूषण रविन्द्र आकोटकार यांनी जिल्हा कृषी अधीक्षक डाबरे यांचा सतकार केले. याप्रसंगी कृषी अधिकारी सवडतकर व कृषी विभागचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.