Breaking News
recent

अंढेरा येथील वैद्यकीय अधिकारी यांची दांडी!आरोग्य साहाय्यिका यांनीच केले जख्मी रुग्णांवर उपचार.



प्रतिनिधी/भरत जोगदंडे

स्थानिक अंढेरा येथे ग्रामीण भागातील महत्वाचे म्हणून ओळखले जाणारे अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.26आॕगस्टला दुपारी येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल रिंगे हे गैरहजर असल्याने  जख्मी रुग्णांवर आरोग्य साहाय्यिका यांच्या कडुन उपचार करावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असुन रुग्णांच्या नातेवाईकांनी कामचुकार असणारे वैद्यकीय अधिकारी यांच्याविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की;दि.26आॕगस्ट रोजी शेतकरी वर्गाचा महत्वाचा पोळा सण असल्याने तो साजरा करण्यासाठी शेतातुन घराकडे येत असताना दुपारी ४ वाजता ज्ञानेश्वर सानप व शिवाजी तेजनकर हे दोघे गणेश सानप यांच्या पोल्ट्री फार्म जवळ मोटारसायकल गाडीवरुन पडल्याने दोघांनाही डोक्याला,हात,पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना तात्काळ अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले परंतु येथील कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल रिंगे हे गैरहजर असल्याने जख्मी रुग्णांवर येथे कार्यरत असणाऱ्या आरोग्य साहाय्यिका सुषमा जाधव व जयश्री इंगळे यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्याविना उपचार करत जखमींना गंभीर दुखापत असल्याने शिवाजी तेजनकर यांना चिखली येथे तर ज्ञानेश्वर सानप यांना देऊळगाव मही येथे पाठविण्यात आले.परंतु येथील कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात जमलेल्या संतप्त जमावाने तिव्र नाराजी व्यक्त केली.

वैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असताना अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी हे चोवीस तास हजर असायला पाहिजेत असताना तसेच पोळा हा शेतकऱ्यांचा सण असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास येथील वैद्यकीय अधिकारी जातीने हजर असायला पाहिजेत असताना ते आजही गैरहजर असल्याने त्यांची रुग्णाप्रती उदासीनता आजही दिसून आली. तसेच यापुर्वीही गैरहजर असल्याने सेवानगर येथील वयोवृद्ध महिलेला उपचारासाठी ताटकळत बसावे लागले होते.येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी नेहमीच का गैरहजर असतात? त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडणे साहजिक आहे.यावेळी मधुकर सानप, ज्ञानेश्वर जायभाये,गणेश सानप,नितीन नागरे,रवि सानप,ऋषी तेजनकर,सुनिल सानप,सचिन वाघ,अन्वर भाई सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.

  जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाच आता उपचार करणे काळाची गरज! 

अंढेरा येथे ग्रामीण भागातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असुन येथुन अंढेरा गावांसह परिसरातील मोठ्या संख्येने रुग्ण हे उपचारासाठी येत असतात.परंतु नेहमीच रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याने व रुग्णांची हेळसांड होत असल्याने संपूर्ण जिल्हभर चर्चेत असणारे अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आता तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीच उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.संबधित प्रकाराबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ दत्ता मांटे यांच्याशी संपर्क साधला असता कामचुकार वैद्यकीय अधिकारी यांच्यावर  योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.


"अंढेरा येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी यांना फोन वरुन विचारणा केली असता आज 26 आॕगस्टला कलेक्टर डिक्लेअर सुट्टी असल्याने मला सुट्टी आहे.अशी प्रतिक्रिया वृत्तपञ प्रतिनिधीशी बोलताना दिली." विशाल रिंगे   वैद्यकीय अधिकारी  प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा 


"अंढेरा येथील घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांचीशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने वैद्यकीय अधिकारी हे नेहमीच हजर असायला पाहिजेत.गैरहजर व कामचुकार असणारे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल"! डॉ.प्रशांत पाटील  जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा


Powered by Blogger.