Breaking News
recent

महाळूंगी जवळ जबर अपघात दुचाकीस्वार गंभीर जखमी

 


नांदुरा प्रतिनिधी

   नांदुरा मोताळा रस्त्यावर महाळूंगी जवळ चारचाकी व दुचाकी मधे जबर अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.याबाबत सविस्तर असे की मोताळा वरून नांदुरा येणारी चारचाकी मारुती सुझुकी गाडी क्रमांक एम एच १२ डी वाय ५६७५ व नांदुरा कडून मोताळा जाणारी टिव्हीएस कंपनीची  दुचाकी एम एच २८ ए पी २१८९ यामधे अतिशय जोरदार धडक होऊन दुचाकीचा अगदी चुरा होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी  झाला असून चारचाकी गाडी चालकाच्या छातीला मार लागला आहे. 

   ही घटना दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. अपघात झाल्याचे समजताच महाळूंगी येथील सुजाण नागरिकांनी घटनास्थळी पोहचून रुग्णवाहिकेला बोलावले नंतर रुग्णवाहिका आल्यानंतर जखमींना नांदुरा येथे हलविण्यात आले.वृत्त लीहेपर्यंत अपघात ग्रस्तांची ओळख पटली नव्हती

Powered by Blogger.