Breaking News
recent

पाच तलवारीची वाहतूक करणारे तिन आरोपी जेरबंद



बुलढाणा प्रतिनिधी

 ऑटोमधून पाच तलवारीची वाहतूक करणा-या तिन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जेरबंद केल्याची घटना 22 ऑगस्ट रोजी बुलढाणा- अजिंठा रस्त्यावर घडली.

   स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुलढाणा शहरात पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, प्रवासी ऑटो क्रमांक एमएच 28 टी-1460 मधून बुलढाणा येथून अजिंठाकडे काही इसम धारदार तलवारी घेवून जात आहेत. 

  यावरून गिते यांनी पथकाला माहिती दिली असता पथकाने अजिंठा रस्त्यावर नाकाबंदी केली असता ऑटो क्रमांक एमएच 28 टी-1460 बुलढाणाकडून येणा-या ऑटोला थांबवून तपासणी केली असता ऑटोमध्ये 5 धारदार तलवारी निळया रंगाच्या वेल्वेटमध्ये प्रत्येक तलावारीची लांबी 32. 5 इंच किंमत 75 हजार रुपये तसेच प्रवासी ऑटो व दोन मोबाईल किंमत 20 हजार असा एकुण 1 लाख 5 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. 

  या प्रकरणी शेख परवेज शेख शकिल 27, सैयद समीर सैयद युसूफ 32, सैयद साकिब सैयद अलीम 25 सर्व राहणार जोहर नगर वार्ड क्रमांक 5 यांना जेरबंद करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, स्थागुशाचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदशर्नाखाली सपोनि विलासकुमार सानप, पोहेका दिपक लेकुरवाळे, पोहेका रामविजय राजपूत, पोना पंकज मेहर, विजय वारूळे, अनंता फरताळे, पोका सतिष जाधव, मपोका सरिता वाकोडे यांनी केली.

Powered by Blogger.