बेपत्ता तरुणांचा मृतदेह विहिरीत आढळला
ग्राम पोटळी येथील 32 वर्षीय युवक प्रवीण सुभाष तायडे हे घरून बेपत्ता असल्याची फिर्याद श्री राजू श्रीराम तायडे यांनी 20/8/22 ला नांदुरा पोलीस स्टेशनला दिली होती. तेंव्हा पासून पोलीस आणि पंचक्रोशीतील नागरिक प्रवीण यांचा शोध घेत होते. पोटळी येथील रवींद्र दिवाने यांनी फिर्यादी राजू तायडे यांना फोन करून माहिती दिली की प्रवीण सारख्या दिसणाऱ्या मुलाचे प्रेत माझ्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगत आहे. वरील माहिती मिळताच राजु तायडे व इतरांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खातरजमा केली असता सदर प्रेत हे प्रवीण यांचेच असल्याचे लक्षात आले.
प्रवीण यांचा मृतदेह उबड्या अवस्थेत होता. मृतदेह विहिरीतून वर काढण्याकरीता नांदुरा येथील समाजसेवक संस्था ओमसाई फाऊंडेशन ची रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले. रेस्क्यू टीमचे विलास निंबोळकर, पियुष मिहाणी, किरण इंगळे, कमलेश बोके, कृष्णा नालट, अश्विन फेरण, वैभव रहाणे, राजू बगाडे या सर्वांनी नांदुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री देविदास चव्हाण व त्यांचे सहकारी कर्मचारी यांचे समक्ष मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.