गुप्तेश्वर महादेव संस्थान श्रावण सोमवार निमित्त कावड यात्रा
प्रमोद हिवराळे जिल्हा प्रतिनिधी
किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीप देशमुख कावळ यात्रा घेऊन गुप्तेश्वर महदेव संस्थान दोदवाडा येथे निघाले.आज पहिला श्रावण सोमवार आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. त्यामुळे शिवभक्तांसाठी सावन महिना खूप खास आहे. या महिन्यात केलेली शिवाची पूजा अत्यंत लाभदायक असते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. भगवान महादेवाच्या कृपेने मोठमोठी संकटही दूर होतात.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने व्रत केल्यास त्याला भगवान शंकराची कृपा प्राप्त होते . भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीप देशमुख किशोर मागटे सुपेस मांगटे गजानन तायडे, सुधाकर ढोले सूपेश महाले जय मांगटे प्रणव गिरे आकाश तायडे प्रशांत देशमुख सर व इतर ही शंभू भक्त कावड यात्रेत सहभागी होते