मनसेचे गजानन ठोसर यांनी बांधले शिवबंधन बुलडाणा जिल्ह्यात मनसेला खिंडार
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मनसे (परिवहन) चे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर यांनी आज २ ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना नेते खा.अरविंद सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून बुलडाणा जिल्ह्यात मनसेला खिंडार पाडले आहे.
बुलडाणा जिल्हा मनसे (परिवहन) चे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर हे धडाडीचे सक्रीय कार्यकर्ते असून त्यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना सोडविण्याकरीता रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना धारेवर धरीत सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. तर न्याय न मिळाल्यास शासकीय कार्यालयांची तोडफोड करून अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम केले आहे. जनतेच्या हिताकरीता काम करीत असतांना त्यांच्यावर गेल्या २० वर्षात बहुसंख्य आंदोलनांचे गुन्हे दाखल असून त्यांना यापुर्वी ४ जिल्ह्यातून तडीपारीच्या नोटीसेस बजावण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणी त्यांना क्लिनचीट मिळाली आहे.
आज २ ऑगस्ट रोजी त्यांनी बुलडाणा जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, बुलडाणा जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, जळगांव जामोद तालुकाप्रमुख गजानन वाघ व आदी पदाधिकाNयांच्या उपस्थितीत मुंबई येथे मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिवसेना नेते खा.अरविंद सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करीत शिवबंधन बांधले.