वडनेर भोलजी येथील 32 वर्षीय इसम बेपत्ता
प्रतिनिधी नागेश सुरंगे
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील 32 वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची नोंद नांदुरा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.वडनेर भोलजी येथील दिनेश मारुती पांडे हे 32 वर्षीय इसम कुणाला काही न सांगता राहत्या घरून बेपत्ता झाले आहेत.
सदरील इसमाजा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला असता परंतु कुठेही आढळून आली नाही. नातेवाईकांनी दिलेले फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद नांदुरा पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती 3 ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे.