प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेसाठी खा. रक्षाताई खडसे यांनी घेतली दिल्ली येथे सचिवाची भेट
प्रतिनिधी नागेश सुरंगे
रावेर लोकसभा मतदार संघातील नगरपालिका क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास (शहरी) योजना – PMAY अंतर्गत प्रस्तावित व मंजूर असलेल्या घरकुल बाबत आजप्रधानमंत्री आवास (शहरी) योजना चे सचिव मा.श्री.मनोज जोशी यांची खा. रक्षाताई खडसे यांनी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.यावेळी दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातील विविध विभागांतर्गत मंजुर घरकुलांबाबत उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक झालेली असून पीएमएवाय च्या कम्प्लिशन सर्टिफिकेट रिलीज केले नसल्यामुळे तसेच मागील सरकारशी विभागाचा ताळमेळ नसल्यामुळे लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळणेसाठी विलंब झाला.
तरी याबाबत उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी संबधितांना सूचना केल्या असुन कम्प्लिशन सर्टिफिकेट रिलीज होताच पुढील हप्त्याचा निधी वर्ग करण्यात येईल, अशी माहिती सचिव मा.श्री.मनोज जोशी यांनी दिली. तसेच सदर योजनेसाठी नेमण्यात आलेले शहर स्तरीय तांत्रिक कक्ष (सीएलटीसी) कर्मचाऱ्यांची पुणे येथे बैठक झालेली आहे. तसेच त्यांचे बाकी असलेले मानधन लवकर त्यांना मिळणार असुन योजनेला लागलेल्या ब्रेकनंतर पुन्हा योजना गतिमान होणार आहे अशी माहिती यावेळी मंत्रालयामार्फत देण्यात आली.