आधारपर्व फाउंडेशनच्या वतीने कुसुमबाईस महिण्याचा किराणा साडी चोळी देऊन सन्मान करुन मदत नाही तर कर्तव्य उपक्रम संपन्न
अकोला
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील आजाराशी झुंज देत साथ सोबती पतीच्या निधनाने दुःखाचा डोंगरात कोसळून घरात एकट्याच राहत असणाऱ्या अकोला शहरातील निराधार महिला कुसुम तायडे घरामध्ये एकट्याच राहतात त्यांना मुलं बाळ कोणीच नसून कोणाचाच सहारा नाही त्या कॅन्सर आजाराने त्रस्त असुन आजाराशी झुंज देत आहे त्यांची सांत्वन भेट घेऊन नेहमी सेवाकार्यात गरीब गरजु अपंग निराधार यांना मदतीचा हात देणारे आधारपर्व फाउंडेशनच्या वतीने फुल ना फुलाची पाकळी का होईना मदत म्हणून कुसुमबाई यांना एका महिन्याच्या किराणा व साडी चोळी देऊन फाउंडेशनच परिवारातील सदस्यांच्या सहकाऱ्याने सन्मान करण्यात आला.
या सेवा उपक्रमात सुनीताताई ताथोड,आर.के.भैया,नीताताई वायकोळे,वैशाली जाधव,अर्जुन पाटील,श्रीधर पाचपोर,अमोल इंगोले,संदिप जैन,शिवबा मेटकर,संतोष फाळके,श्रद्धा गढे,मंगेश बुरघाटे,अनंता वाघ,आकाश कावळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. आपल्या भागात गरीब गरजु अपंग निराधार असल्यास आम्हाला कळवाल आम्ही नक्की तिथं जाऊन मदतीचा हात देऊन सेवा उपक्रम राबऊ असे कार्यकारी सदस्या सुनीता ताथोड यानी कळविले तर प्रत्येकाने आपल्या भागात आपल्या माणसांसाठी आपल्या माणसांकडून जमेल त्या स्वरूपात शक्य होईल तेवढी मदत करावी आम्ही खऱ्या अर्थाने मदत म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून कार्य करतो हि भावना आधारपर्व फाउंडेशन अध्यक्षा श्रद्धा गढे व्यक्त केली.