Breaking News
recent

मलकापुरात दहीहंडी उत्सव साजरा , गोविंदानी केली दह्यादुधाची लयलूट


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

    मच गया शोर सारी नगरी रे..गोविंद आला रे आला . अशी आरोळी देत मलकापुर शहरातील ४० बिघा परिसरातील गोविंदा पथकांनी चित्तथरारक मानवी मनोरे रचून दहीहंडी उत्सव साजरा केला. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता सुरू झालेला गोविंदाचा जल्लोष शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होता. शहर आणि परिसरात गोविंद पथकांनी अनेक लहानमोठ्या हंड्या फोडून दहीदुधाची लयलूट केली.

       गोविंदा पथकांनी रचलेले चित्तथरारक मानवी मनोरे पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्याचे अक्षरशः पारणे फिटले . ४० बिघा परिसरात शंभुराजे ग्रुप च्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवप्रेमींसाठी मुख्य आकर्षण ठरली . दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सार्वजनिक सणांवर निर्बंध असल्याने दोन वर्षे दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता . त्यामुळे दहीहंडी उत्सवाचा तितकासा उत्साह पहावयास मिळाला नव्हता , मात्र यावर्षी दहीहंडी सणावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले असल्याने ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्साह पाहावयास मिळत होता . मलकापूर शहरातील ४० बिघा येथे शुक्रवारी रात्री हंडी फोडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सकाळपासूनच लहान मुलांची गोविंदा पथके रस्त्यावर दंगा करताना दिसत होती . शहरातील घरासमोर बांधलेल्या छोट्या मोठ्या हंड्या फोडण्यात गोविंदा पथकांना ऐक वेगळाच आनंद मिळत होता . शहरात ठिकठिकाणी गोविंदांच्या ध्वनिफिती वाजविल्या जात होत्या. संपूर्ण शहर गोविंदामय झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते .


   मलकापुर शहरातील ४० बिघा कुलमखेड , छत्रपती शिवाजी नगर या ठिकाणी देखील दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शहरात दहीहंडी उत्सवासाठी हजारो उत्सव प्रेमी एकत्र आले होते . हंडी फोडण्यासाठी चित्तथरारक मानवी मनोरे रचना डोळ्यांचे पारणे फिटत होते . मानवी मनोरे रचताना गोविंदा खाली कोसळत होते मात्र जिद्दीने पुन्हा उभे रहात पुन्हा मानवी मनोरे रचले होते . मलकापुर शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . मलकापुर उपविभागीय पोलीस अधिकारी  अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत दहीहंडी उत्सवावर नजर ठेवून होते .

Powered by Blogger.