नांदुरा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित महालोक अदालत मध्ये निकाली काढण्यात १२३९ प्रकरणात २७ लाख २७ हजार रक्कम झाली वसुल.
नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दि.१३ ऑगस्टला आयोजित महालोक अदालत मध्ये एकूण १२३९ प्रकरणे निकाली काढण्यात असुन त्यामध्ये २७ लाख २७ हजार रूपये रक्कम वसुल करण्यात आली आहे. सुरवातीला ह्या महालोक अदालतचे उद्घाटन न्यायाधीश आर. ए.मीसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.ह्या महालोक अदालत मध्ये एकूण ३३०३ प्रकरणे दाखल करण्यात होती.
त्यापैकी १२१६ प्रकरणात १६ लाख १९ हजार रूपये रक्कम वसुल करण्यात आली तर कोर्टात दाखल १११ दाखल प्रकरणापैकी २३ प्रकरणात ११ लाख ८ हजार रूपये रक्कम वसुल करण्यात आली. ह्यावेळी न्यायाधीश आर.ए. मीसाळ व न्यायाधीश एम.बी.धजुका यांनी ही प्रकरणे निकाली काढली. पंच म्हणून अॅड. ए.के. सातपुळे व अॅड.एस.एम. सैय्यद यांनी काम पाहिले.न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक एम.एन.गावंडे व वरीष्ठ लीपीक आर.बी.परतेती व इतर कर्मचारी यांनी महालोक अदालत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.