बस स्थानकावर एकलव्य संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.
स्थानिक राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकावर एकलव्य शिक्षण क्रिडा व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त दि.१५ ऑगस्टला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. ह्यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारत माता पूजन व महापुरूषाच्या फोटोला आमदार राजेश एकडे, प्रभारी तहसीलदार सुरळकर तसेच पोलिस निरीक्षक भुषण गावंडे,नांदुरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष अरूण पांडव, उपाध्यक्ष जगन्नाथ डांगे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते माल्यर्पण करण्यात आले.
ह्यावेळी "आझादी का अमृतमहोत्सव "निमीत्त बस स्थानकात अतिशय बोलकी रांगोळी काढणाऱ्या ॠतुजा वराडे यांचा आमदार राजेश एकडे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाहतुक नियंत्रक प्रदिप गायकी, विकास तिवारी,राहूल पांडव तसेच एकलव्य शिक्षण क्रिडा व बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.यावेळी वाहक, चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.