जिल्हयातील शिक्षकांची चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रतिक्षा संपली,१९८ शिक्षकांना चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी लागू
![]() | |||||||||||
बुलडाणा :
जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या १९८ शिक्षकांनी नियमित सेवेची अखंड १२ वर्ष सेवाकाळ पूर्ण केल्यामुळे अखेर सदर शिक्षकांना चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करण्यासंदर्भातील मार्ग झाला मोकळा झालेला आहे.
जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या १९८ सहाययक शिक्षक,पदवीधर शिक्षक,केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, निवडश्रेणी सहाय्यक अध्यापक तसेच विद्यालयामध्ये कार्यरत असलेले शिक्षक यांचा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.
काही शिक्षकांना यापूर्वीच वरीष्ठ वेतनश्रेणी लागू झाल्याबाबतचा आदेश निर्गमित झालेला असून उर्वरित १९८ शिक्षकांना ४ ऑगस्ट च्या आदेशानुसार चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीची समस्या मार्गी लागलेली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क लढा सेनेच्या माध्यमातून या विषयासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.या विषयी सहकार्य करणाऱ्या मा.निवड समिती,प्रशासन,शिक्षण समिती सदस्य यांनी सात्यत्याने पाठपुरावा केलेला आहे.
यामध्ये प्रामुख्याने विदर्भ प्रांताध्यक्ष प्रमोद पवार,जिल्हा संपर्क प्रमुख सुनील जाधव,जिल्हाध्यक्ष रवी वाघ, जिल्हा सरचिटणीस प्रविण वायाळ,कार्याध्यक्ष गैबीनंद घुगे ,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क लढा सेनेचे जिल्हा समन्वयक हुसेन कुरेशी,प्रशांत जुमडे, संतोष कापडे, तुकाराम चव्हाण,राम कांगणे,डोंगरदिवे,बाळू गव्हाणे,संतोष काकड,संदीप इंगळे,नवल पहुरकर, आशिष चिंचोळकर,निलेश कठाले,महिला जिल्हा समन्वयक मनिषा भराड,आदी पदाधिकारी यांनी सदर समस्या निकाली काढण्यासाठी परिश्रम घेतले आहे असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.