सर्वसामान्यांना जगू द्यायचे नसेल तर ते घेत असलेल्या प्राणवायुवर कर लावा!-संतोष गवई
जळगांव जामोद प्रतिनिधी
वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. जिएसटी काउंसिलच्या ४७ व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घेतलेल्या निर्णयानुसार दि.१८ जुलै पासून काही वस्तू व सेवावरील जिएसटी दरवाढ लागू केली. त्यामध्ये सामन्य जनतेच्या हिताच्या व दैनिक वापराच्या दुग्धजन्य वस्तू व कृषी उत्पादने जिएसटी कक्षेत आणून सरकारने सामन्य माणसाला जिवन जगने अवघड केले आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना जगू द्यायचे नसेल ते घेत असलेल्या प्राणवायु वरही जिएसटी कर लावा असा घाणाघात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष गवई यांनी जिल्हा धिकारी बुलडाणा यांना उपविभागीय अधिकारी ( राजस्व) जळगांव जामोद यांच्या मार्फत निवेदन दिल्यानंतर प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना व्यक्त केला.ह्यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ह्या निवेदनावर संतोष गवई, रामकृष्ण रजाणे,देवानंद दामोदर, सुनिता हेलोडे, सोनमताई वानखडे, मुजिबखान, ज्ञानेश्वर कोकाटे, महादेव बोदडे, सुपडा बांगर इत्यादीच्या सह्या आहेत.ह्यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.