घरकुलाचा हप्ता वाढवून द्यावा-वैभव वानखडे यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
बुलडाणा :- २५ आँगष्ट रोजी बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन रमाई घरकुल योजनेचा पहिला हप्ता कमी करण्यात आला असून ,तो पहिला हप्ता वाढवण्यात यावा व रमाई घरकुल योजना ही 1 लाख 20 हजार रुपये ची असून ती दोन लाख रुपये करण्यात यावी व घरकुला चा पहिला हप्ता हा 15 हजार रुपये वरून 50 हजार रुपये करण्यात यावा यासाठी माननीय जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित भाई वैभव वानखेडे संस्थापक अध्यक्ष युवा भिमसेना व सिद्धांतभाई वानखेडे भिम आर्मी जिल्हा अध्यक्ष बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.