Breaking News
recent

कृषी विभागात ठिबक सिंचन घोटाळा प्रकरणात दोषींवर कारवाईसाठी काँग्रेस करणार आंदोलन?



प्रतिनिधी :- अनिल दराडे

    सिंदखेडराजा तालुका कृषी विभागांमध्ये ठिबक योजनेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्यामुळे कृषी विभागांमध्ये एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे कृषी विभागाकडून संबंधित अधिकृत शेती साहित्य विक्री केंद्र चालकावर गुन्हा दाखल होणार असल्याचे विश्वानिय माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागामार्फत सिंचनातून समृद्धी आणि पाण्याची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान कृषी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनाचा लाभ दिला जातो या योजनेमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी विभागाच्या मोका पाहणीमध्ये घोटाळा उघडकीस आला असल्याचे कृषी विभाकडुन सांगण्यात आले आहे कृषी विभागात महाडीबीटी व पोखरा योजनेच्या अंतर्गत ठींबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेकडो शेतकर्‍यांचे आँनलाईन अर्ज सादर करण्यात आले व त्यांना कृषी विभागामार्फत पुर्व संमती देण्यात आली होती याच पुर्वसंमतीचा फायदा  ठिबक विक्रेते व संबंधित शेतकऱ्यांनी आर्थिक फायदा घेण्यासाठी कंपनीचे आँनलाईन हुबेहूब बिल सिझर केले पंतप्रधान कृषी सिंचन योजना 2021-22अंर्तगत अनुदान वितरणात  हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

त्यामुळे सदरील घोटाळेबाज अधिकारी व अधिकृत विक्रेते यांच्यावर रितसर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा तालुका कॉंग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे सिंदखेडराजा तालुका कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष शिवदास रिंढे यांनी  बोलतांना सांगितले.



Powered by Blogger.