Breaking News
recent

प्रशांत गुंजकर सरांच्या तेजस्वी अभ्यासिकेच्या माध्यमातून 122 विद्यार्थी लागले नोकरीला


शेतकरीपुत्र असलेले गुंजकर चालवताहेत स्वत:च्या तीन अभ्यासिका अन् कृषि सेवा केंद्र

मेहकर तालुका प्रतिनिधी शिवशंकर मगर

    शेतकऱ्यांची पोरं मनात आणलं, तर काहीही करू शकतात  ती धमक त्यांच्या रक्तातच असते.नवनिर्माणाची ताकदही त्यांच्यातच ! वरोडी गावातील शेतकरीपुत्र प्रशांत गुंजकर यांनी मोठ्या पदाची सरकारी नोकरी लागत असूनही, तिच्याकडे पाठ फिरविली  आणि मेहकर साखरखेर्डा अन् हिवरा आश्रम येथे केवळ सहा महिन्याच्या अंतराने अभ्यासिका सुरू केली. यामुळे मेहकर परिसरातील विद्यार्थी अभ्यासासाठी पुणे, औरंगाबाद येथे न थांबता गावाकडे राहूनच अभ्यास करीत आहेत. 

    यामुळे त्यांचे रुमचे भाडे, मेस व इतर खर्च वाचला आहे. विशेष म्हणजे गुंजकर सरांच्या तेजस्वी अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या 122 विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी लागली आहे. गुंजकर सर हे केवळ अभ्यासिकाचं चालवत नाहीत, तर त्यांचे कृषि सेवा केंद्र सुद्धा आहे. यामाध्यमातून ते शेतकऱ्यांना योग्य किटकनाशकं देतात. ते विद्यार्थी व शेतकऱ्यांचे समुपदेशन देखिल करतात. भावी काळात शेतकऱ्यांसाठी खूप मोठी योजना त्यांच्याकडे आहे. बिगरशेती प्रकल्पाच्या माध्यमातून बळीराजाला पैसे कमाविता येणार आहेत. गुंजकर सर यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा झंझावात पाहून त्यांचा स्वप्नपूर्ती मिडिया कार्यालयात सत्कार करण्यात आला आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा…!!

Powered by Blogger.