राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याच्या सभोवतालचे अतिक्रमण काढण्यासाठी महाराष्ट्र धोबी समाज महासंघाचे निवेदन
प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर बुलडाणा रोडवरील न. प. कॉम्प्लेक्स समोर असलेल्या राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात झालेले अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य धोबी महासंघ शाखा मलकापूरच्या वतीने आज ८ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी न. प. मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण समाज बांधवांच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतर सुरू झाले व ते अंतीम टप्प्यात आलेले आहे.
मात्र पुतळ्याच्या परिसरामध्ये आजू-बाजूला अतिक्रमण धारकांनी अतिक्रमणे केली असल्याने त्याठिकाणी साफसफाई सुध्दा होत नसून ज्या महान संतांनी स्वच्छतेचा मंत्र देवून समाज प्रबोधन केले त्यांच्याच पुतळ्या समोर अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे त्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी अनिल तांदुळकर, लहु कंडारकर, उमेश जाधव, अजय टप प्रहार ,गणेश खर्चे, मुन्ना मांडोळे, शिवशंकर दहीभाते, पवन रायपुरे, संजय सपकाळ, शांताराम जामोदे, देविदास कंडारकर, गजानन राऊत, अक्षय रायपुरे, रितेश दहीभाते, विशाल जावीकार, बाळाभाऊ जामोदे, संजय रायपुरे, बळीराम बावस्कर आदी उपस्थित होते.