चंद्रशेखर आझाद मंडळाच्या पुढाकाराने "त्या"१५थॅलेसीमीयाग्रस्त चिमुकल्यांना साईजीवन रक्तपेढीने घेतले दत्तक
![]() |
साईजीवन रक्तपेढीकडून दत्तकपत्र स्वीकारतांना चिमुकले व मंडळाचे कार्यकर्ते |
नांदुरा प्रतिनिधी
नांदुराः थॅलेसीमीया या असाध्य आजाराचे नाव काढताच सर्वांसमोर येते तो कधीही बरा न होणारा असा हा आजार दुर्दैवाने ज्यांना या आजाराने ग्रासले त्यांचे संपूर्ण आयुष्यच परावलंबी होऊन बसते आजाराला कोणताच धर्म किंवा जात नसते आपल्याही शहर व तालुक्यात सर्व जाती-धर्मातील व ५वर्षांच्या अबोल बालकांपासून ते २५वर्षांच्या युवकापर्यंत अशी काही अभागी मुल-मुली आहेत यातील काहींना दर चार आठवड्यातून तर काही बालकांना दोनच आठवड्यातून रक्ताची नितांत आवश्यकता भासते ते रक्त जर वेळेवर नाही मिळाल तर त्या चिमुकल्यांचा प्राण कंठाशी येतो त्यामुळे रक्ताच्या एका बाटलीसाठी त्या अभागी जीवांची व त्यांच्या आई-वडीलांची होणारी सैरावैरा धावपळ , जीवाची तगमग त्यांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून हृदय पिळवटून जाते
हीच बाब हेरत शहरातील कोणत्याही सामाजिक कार्यात अग्रक्रमाने भाग घेऊन त्या कार्याचा एकदा विडा उचलला की तो मोहीम फत्तेच करणाऱ्या चंद्रशेखर आझाद मंडळाच्या सोनुभाऊ जैस्वाल व कार्यकर्त्यांनी त्या बालगोपालांची रक्तासाठी होणारी हेळसांड कायमची थांबावी याकरीता अकोला येथील साईजीवन रक्तपेढी शी यशस्वी बोलणी करून थॅलेसीमीयाग्रस्त चिमुकल्यांचे साईजीवन रक्तपेढी शाखा खामगावचे रक्त संक्रमण अधिकारी श्री पाटणकर साहेब यांनी दत्तकपत्र बनवून घेतले तसेच चंद्रशेखर आझाद मंडळाच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान ६सप्टेंबर २०२२रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन करुन त्या मुलांच्या १२महिन्यांच्या रक्ताची तजवीज करून देणार आहे .