दादुलगाव येथे स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त सामुहिक राष्ट्रगीत
सागर झनके प्रतिनिधी
दादुलगाव :- भारत देशाला या वर्षी स्वातंत्र्य होवून पंचाहत्तर वर्ष पुर्ण होत आहे,त्यामुळे केद्र सरकारने संपूर्ण देशामध्ये स्वतंत्रता का अमृतमहोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.तशा सुचना राज्यांना सुद्धा दिलेल्या आहेत.आठ ते सोळा तारखेच्या दरम्यान विविध स्पर्धा,सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे.त्याअनुषंगाने 9 आँगष्ट रोजी दादुलगाव येथे म. पु. प्रा. शाळेच्या विद्यार्थ्यांची गावात प्रभातफेरी काढून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नियोजित वेळेत अकरा वाजता सामुहिक राष्टगीत झाले..कार्यक्रम पत्रीकेप्रमाणे देशाच्या संरक्षणासाठी सिमेवर कर्तव्य बजावणारे बी.एस.एफ.चे रिटायर सैनिक रामेश्वर रणीत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,व त्यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केले.शाळेमध्ये सकाळी रांगोळी स्पर्धेचे आयोजन सुद्धा केले होते.रांगोळी स्पर्धेतील मुलींना पेन देवून सन्मानित करण्यात आले. राष्ट्राची अखंडता अबाधित रहावी,प्रत्येकाच्या घरावर तीरंगा ध्वज फडकवावा यासाठी यासाठी केंद्रसरकाने विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे.त्यासाठी गावामध्ये जनजागृती करण्यात आली.
सदर कार्यक्रमास सरपंच सौ.सिमा देवचंद पवार,शाळा समितीचे अध्यक्ष राजेश कवळे,पत्रकार सागर झनके निळे सर,शिंगोटे,म्हस्के सर,केंद्र प्रमुख ठोंबरे सर,,बी.एस.एफ.चे.रिटायर जवान रामेश्वर रणित,ग्रामपंचायत शिपाई भागवत झालटे,विशाल झालटे,सरपंच पती देवचंद पवार यांचेसह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ हजर होते