शालेय पोषण आहाराबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी करून कारवाईचे दिले आदेश
प्रतिनिधी नागेश सुरंगे
दिनांक 13 ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष राजू राऊत यांच्यासह शहराध्यक्ष नागेश भटकर, योगेश म्हसाळ हे शालेय पोषण आहारातील धान्यवाटप कमी प्रमाणात केला यासह विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. उपोषणाचा धसका घेत गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यासह गटशिक्षणाधिकारी फाळके,शालेय पोषण आहाराचे अहिरे यांनी लेखी स्वरुपात पत्र देऊन दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत सर्व मुद्द्याचे सखोल तपासणी करून तसेच तपासणीमध्ये संबंधित शाळांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले.
सदर उपोषण आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी मध्यस्थी केल्याने तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासंबंधी संधी दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी उपोषण करते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नागेश भटकर यांच्यासोबत या विषयावर सविस्तर चर्चा केली. तसेच तालुकाध्यक्ष राजू राऊत, शाखाध्यक्ष योगेश म्हसाळ यांच्या समक्ष सदर उपोषण सोडण्यात आले.