बेपत्ता असलेल्या उपोषणकर्त्याच्या पत्नीचा कुटुंबासह बीडी ओ च्या कक्षातच मुक्काम ! म्हणे पती दाखवा.ग्रामस्थ आक्रमक
संग्रामपूर प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या संतोष गाळकर या उपोषणकर्त्याच्या पत्नीने आज दुपारी संग्रामपूर पंचायत समिती मध्ये येऊन टाहो फोडत पतीचा शोध घ्या अशी मागणी केली, पण बी.डी.ओ. संजय पाटील हे नेहमीप्रमाणे आजही प.स.मधुन निघुन गेले. एक एक करता सर्व अधिकारी निघून गेले पंरतु शारदा संतोष गाळकर ह्या मात्र आपल्या २० वर्षाची कल्याणी व १७ वर्षाचा सुपेश नावाच्या मुलासह न्याय मिळेपर्यंत रात्रीचा मुक्कामही प.स.मधे केला असल्याने प.स.प्रशासनाची लाज चवाहाट्यावर आली आहे.
वरवट खंडेराव ग्रा.प.ने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व ग्रा.प.रेकार्डवर ८ आ दुरुस्ती मागणी गेल्या आठ महिन्यांपासून बेपत्ता असलेले उपोषणकर्ते संतोष गाळकर यांनी केली होती. पंरतु वेळो वेळी ग्रा.प.व प.स.अधीकाऱ्यांनी दिरंगाई करत न्याय न दिल्याने उपोषण कर्ताच अचानक गायब झाले असल्याने प.स.अधिकाऱ्यांवरच संशय निर्माण होत आहे. त्यामुळे जो पर्यंत माझ्या पतीला कोठे नेऊन ठेवले आहे हे सांगत नाही तो पर्यंत प. स. मधेच मुक्काम करणार असल्याचा निर्णय उपोषण कर्ते यांच्या पत्नीने घेतला आहे. त्यांच्या सह तालुक्यातील शेकडो नागरिक पंचायत समितीत उपस्थित आहेत. न्याय मागणाऱ्या महिलेची दखल न घेता सर्वच अधिकारी प.स.मधुन निघून गेले असल्याने जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार का? असा प्रश्न जिल्हा प्रशासनाकडे केला आहे.